यंदाचा 31 डिसेंबर स्पेशल झाला.तसे 31 डिसेंबर कधी आम्ही साजरा करत नाही.पूर्वी घरी एकच दूरदर्शन चैनल असायचे अन 31 डिसेंबर दिवशी काही विशेष कार्यक्रम असायचे.आम्ही आवर्जून घरातील सर्वजण एकत्र तो कार्यक्रम पहायचो.तोच आमचा 31 डिसेंबर पण पुढे चैनलच्या गर्दीत तो हरवला.अन सोशल मीडियावर सर्वाना शुभेच्छा संदेश पाठवण्यापर्यंत येऊन तो येऊन थांबला...
पण कालचा 31 डिसेंबर मात्र खऱ्या अर्थाने साजरा झाला तो बदलत्या जीवनशैलीत, हरवलेल्या कुटुंब व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या समस्या,अन त्यातून पुढे जाण्यासाठी स्वतःपासून नव्या वर्षात कशी सुरवात करावी याबद्दल मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाने.मराठा सेवासंघाच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात 2017 ला निरोप व नव्यावर्षाचे स्वागत करताना आदरणीय खेडेकर साहेबांनी छोटी झालेली कुटुंबे,अतिसुरक्षित रहाण्याच्या सवयीने स्वतःच्या क्षमतांचा विसर पडत असलेले पालक व बालक,सुजाण पालकत्व म्हणजे नेमके काय?स्वतःच्या शरीराकडे होणारे दुर्लक्ष अन त्यासाठी नियमित व्यायामाचा संकल्प पूर्णत्वास नेण्याची गरज अत्यन्त सहजपणे उदाहरणांसह साहेबानी सांगितली.
समाजाचे छोटे रूप कुटुंब,अन या कुटुंबात मातेचे स्थान अनन्यसाधारण महत्वाचे.पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेचा त्याग करत,स्त्री पुरुष समतेवर आधारित व्यवस्था स्वतःच्या घरापासून सुरू करण्याचे आवाहन साहेबानी केले.महिलांना बरोबरीचे स्थान हे खऱ्या अर्थाने समाज सक्षम करण्याचे पहिले पाऊल आहे.यावेळी एकतर्फी भाषण न करता उपस्थितांशी अत्यन्त खुला संवाद साहेबानी साधत उपस्थितांना बोलते केले.फक्त मुले इंग्रजी माध्यमात शाळेला घातली म्हणजे जबाबदारी संपली नाही.आईला आगोदर उत्तम इंग्रजी आले पाहिजे.प्रत्येक आईला संगणक हाताळता आला पाहिजे.सध्याच्या काळात आई अपडेट हवी अन त्यासाठी आईने(स्त्रियांनी)स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे.स्वतःची दिनचर्या निश्चित करावी.येणाऱ्या काळात नोकऱ्याच्या मागे धावण्यापेक्षा कोणताही व्यवसाय करण्याची तयारी युवकांनी ठेवावी,तसेच पालकांनी आपल्या मुलांना व्यवसाय,उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करावे.विवाह करताना बऱ्याच वेळा मुलग्यापेक्षा मुलगी कमी शिकलेली असावी असा कल असतो तो बदलून मुलग्यापेक्षा मुलगी अधिक शिकलेली असावी असा दृष्टिकोनात बदल केला पाहिजे.फक्त इंजिनियर व डॉक्टरच होण्यापेक्षा स्वतःच्या उपजत कलागुणांना/क्षमताना वाव देत मनोरंजन विश्वात व माध्यमामध्ये करिअर करण्याकडे तरुण तरुणींनी लक्ष द्यावे असा संदेश आदरणीय खेडेकर साहेबानी दिला.
खऱ्या अर्थाने सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत एका असामान्य व्यक्तिमत्वासोबत त्यांचे विचार ऐकत झाल्याने आजचा 31 डिसेंबर स्पेशल बनला...
🎉🎊आपणांस व आपल्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🌷🌸🌺🌹
🎉🎉 *नवीन वर्ष 2018 हे आपणांस आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…🎉🎉🌹🌹☘☘🌺🌺
अमोल शिंदे
No comments:
Post a Comment