Monday, 16 April 2018
2017/18 जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमधील संवर्ग 1,2,3 ,TUC व TBR याद्या सांगली
Thursday, 12 April 2018
आधी बदली नंतर समाणिकरण
*आधी बदल्या नंतर समाणिकरण*
🖋अमोल शिंदे✒
9420453475
जे मनातून वाटले ते लिहले आहे..
मनातूनच वाचा संघटना व नेताप्रेम बाजूला ठेवून फक्त एक शिक्षक म्हणून वाचूया...
शिक्षक संघटनांनी बदली विषय घेऊन सातत्याने रान पेटवत ठेवले,सुप्रीम कोर्टा पर्यंत ही संघर्ष केला,*मोठी अधिवेशने घेऊन ग्रामविकास मंत्री पंकजाताईं मुंडे यांनी शासन आदेशात सकारात्मक बदल करण्याचे आश्वासन दिल्याचा डांगोरा पिटला. त्यामुळे नक्कीच काही बाबी बदलतील असे वाटत होते.पण जी स्थिती वर्षांपूर्वी होती तीच आज ही आहे.अजूनही त्रुटी दुरुस्त करणार असल्याचे नेते सांगत आहेत.त्रुटी दुरुस्तीच्या मागण्या पाहिल्या तर त्या त्रुटी कमी करण्याच्या आहेत,की त्रुटी वाढवण्याच्या असा प्रश्न पडतो.* अन पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू झाल्यावर न्याय, अन्यायाची बाजु मांडून सोशल मीडियावर बदली हवी-नको अशी चर्चा पेटू लागली आहे.
अनेक शिक्षक बांधव फोन करून सर काय तरी करावं लागतं असे म्हणतात.पण खोटी सहानभूती देऊन आपल्याच बांधवाना अल्पकाळाचे समाधान देण्यापेक्षा काही बाबीकडे निरपेक्ष पणे पहावे लागेल.बदली समर्थक अन विरोधक यादोन्हीच्या पुढील निरपेक्ष भूमिका शिक्षक नेत्यांची हवी.पण दुर्दैवाने ते ही दोन गटात विभागले गेले.बदली नको म्हणणारे बदल्या होऊच नयेत या इर्षेने,तर बदली हवी म्हणणारे बदल्या झाल्याच पाहिजेत या जिद्दीने काम करत असल्याने.बदली प्रक्रियेत काही जणांना 100 टक्के दोषपूर्ण, तर काही जणांना 100 टक्के गुणवत्ता पूर्ण दिसत आहे. फक्त काही अगदी किरकोळ बदल केले तरी ही प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकते.पण टोकाचा विरोधाभास व वर्षभर संघटनानी फक्त भेटी गाठी व केलेली प्रचार प्रसिद्धी पहाता गेली वर्षभर अनेक संघटनांनी प्रयत्न केले पण कोणताही भरीव बदल शासन आदेशात का झाला नाही असा प्रश्न पडतो.मुळात शासन आदेशात काय बदल हवा हेच नेमकेपणाने मांडले गेले काय?अनेक आमदार,मंत्री यांच्या भेटी घेऊन निवेदने दिल्याचे,सचिवांना भेटल्याचे फोटो सातत्याने दिसले पण नेमका बदल काय हवा हे मात्र समजलेच नाही.केल्या जाणाऱ्या अनेक मागण्या या फक्त जास्तीत जास्त लोकांची सहानभूती मिळावी अशा लोकप्रिय व ढोबळ मागण्या होत्या.त्यात नेमकेपणा नसल्याने 12/9 ने दिलेले लाभ ही गमावले.(शिक्षकांनी सुधारणेच्या मागण्या पाहिल्या तर लक्षात येईल संघटना सुरवातीला पती पत्नी यांचे एकत्रीकरण विना अट करा अशी मागणी करते,अन त्याच वेळी दुसरी मागणी एकल शिक्षकावर अन्याय होऊ नये.,हा गोंधळ नाही तर संघटना *सगळ्यांना खुश करा* या धोरणाची अमलबजावणी करत आहेत.बदल्या शासन करणार त्यामुळे दोष शासनाचा आहे आपण सर्वाना दिलासा देऊ.असे म्हणून भूमिका घेऊन सुधारणा होणार नाहीत.
अशावेळी एखाद्या आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांने मत मांडणे धाडसाचेच होईल.पण तरीही एक सुचवावे वाटते आता *बदली नको हा अट्टहास सोडून आपण आधी बदली करा,नंतर समाणिकरण करा* हा पर्याय स्विकारल्यास नक्कीच सामान्य क्षेत्रनिहाहाय ज्युनियर शिक्षकांना,आंतरजिल्हा बदली होऊन आलेल्या 10 वर्षे पूर्ण झालेल्या,महानगरपालिका क्षेत्रातून अतिरिक्त होऊन आलेल्या शिक्षकांना कोणाचेही नुकसान न करता दिलासा मिळेल.व याला कोणाचा आक्षेप असेल असे वाटत नाही.नेतृत्वाने सर्वजण स्विकरतील असा पर्याय पुढे आणला पाहिजे.पण नेतृत्व गोंधळले आहे आजही हा शासन आदेश बहुतांश नेत्यांना समजला नाही मग ते कितपत मंत्रीमहोदय व सचिव साहेबाना सुयोग्य बदल सुचवतील याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.(लगेच काहीजण हा बदली समर्थक आहे की विरोधक याचा डोक्यात खेळ मांडतील पण कृपया त्या नजरेने न पाहता वास्तववादी दृष्टीकोनाने पहा)
बदली प्रक्रियेची अमलबजावणी करताना बदली नको म्हणून भूमिका घेण्यापेक्षा माझी भूमिका
🔴 *मे 2018 पूर्वी सर्व आंतरजिल्हा प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.*
🔵 *तसेच राज्यातील 100 टक्के रिक्त पदे येत्या दोन महिन्यात भरण्यात यावीत यामुळे 100 टक्के वर्गाना जून महिन्यात शिक्षक मिळतील व ते पुढील किमान 3 वर्ष स्थिर असतील अन त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल.समाणिकरण जीच्याबद्दल शासन आदेश आल्यापासून मी सातत्याने सांगतोय जी सर्वात कठीण बाब या आदेशात आहे ती संपेल. सर्व वर्गाना शिक्षक मिळतील विद्यार्थी व सामान्यांच्या शाळांना शिक्षकाविना रहावे लागणार नाही.*
सरकारचा वेग पहाता भरती होईल असे वाटत नाही.आशा परिस्थितीत समाणिकरण नको, अशी भूमिका घेणे म्हणजे जत सारख्या तालुक्यातील शाळा मोठ्याप्रमाणात शिक्षकाविना रहातील.हा दोष सरकारचा आहे.पण एकीकडे जास्त जागा रिक्त न रहाव्यात विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून समतोल साधण्यासाठी समाणिकरण ही तात्पुरती उपाययोजना करता येईल पण 100 टक्के पदे भरणे RTE नुसार बंधनकारक असून सरकारने त्याची अमलबजावणी करायला हवी.समाणिकरण ही तात्पुरती व्यवस्था म्हणून करताना काहीच झालं नाही तर किमान खालील बदल केल्यास बऱ्याच अंशी दिलासा मिळेल-
सध्या बदली मागताना संवर्ग 4 ला सर्व रिक्त पदावर(समाणिकरणला राखीव न ठेवता)बदली मागण्याचा अधिकार द्यावा.व बदली प्रक्रिया पूर्ण करावी.यामुळे बहुतांश शिक्षकांच्या सोयीच्या बदल्या होतील.बदली झाल्यानन्तर मगच या शासन आदेशातील समाणिकरण अमलबजावणी करावी.समाणिकरनातून बदली होणाऱ्या शिक्षकाची जागा रिक्तच ठेवून त्या शाळेवर पुन्हा बदली मिळण्याचा अधिकार त्यांना द्यावा.निश्चित पुढील सहा महिन्याच्या कालावधीत नवीन शिक्षक भरती करावी.अन समाणिकरण बदली साठी गेलेल्या शिक्षकांना परत त्यांच्या मूळ जागेवर बदली देण्यात यावी,समाणिकरण साठी बदली झालेल्या शिक्षकांच्या मूळ जागेवर नवीन शिक्षक न देता.नव्या शिक्षकांना या रिक्त जागेवर नेमणूक दिल्यास शिक्षकास पुन्हा आपल्या शाळेत बदली घेता येईल.
जिल्ह्यात भरपूर जागा रिक्त आहेत एकाच तालुक्यात त्या राहून तेथील विद्यार्थ्याचे नुकसान नको यासाठी समानिकरण केले जाणार.पण आज मिरज मधून एखादे ज्येष्ठ शिक्षक जतला समाणिकरनसाठी बदली होऊन गेले.समजा जिल्ह्यात सर्व तालुक्यात समान 10 टक्के जागा रिक्त राहिल्या.पुढील वर्षी नवीन शिक्षक भरती झाली 100 टक्के पदे भरताना सगळी पदे भरली जाणार त्यावेळी सर्वच तालुक्यात नवीन शिक्षक दिले जातील पण जे समानीकरणात फक्त विद्यार्थ्याच्या हितासाठी स्वतःच्या तालुक्यातून बाहेर गेले ते मात्र परत तेथेच अडकून राहून त्यांचा परतीचा प्रवास कठीण होतो अन त्यामुळे या बदल्याना विरोध होतोय तो वरील उपाय आधी बदली नंतर समाणिकरण आमलात आणल्यास बराच विरोध कमी होईल.ज्युनियर शिक्षकांना समाणिकरण मुळे पदे गोठवल्याने शाळा मागायला जागाच नाही,त्यामुळे सर्व रिक्तपदे दाखवावीत.
माझी सन्माननीय ग्रामविकास सचिव असीम गुप्ता साहेब यांना विंनती आहे जर आपणास विद्यार्थी हितासाठी समाणिकरण करायचे आहे तर आपण ज्या जागा समानिकरणाच्या बदली साठी रिक्त ठेवणार आहोत त्या जागा रिक्त करण्यासाठी तेथील शिक्षकाची बदली दुसऱ्या तालुक्यात करण्याची अथवा शाळेवर करण्याची वेळ आली तर सदर शिक्षक आहे त्या शाळेवरच ठेवून त्याचे तात्पुरते कामगिरी आदेश समानीकरणाने द्यायच्या शाळेवर काढावेत.अन नवीन शिक्षक उपलब्ध होताच आशा समानिकरणातून प्राधान्याने भरलेल्या शाळेवर द्यावा व संबंधीत शिक्षकास पुन्हा त्यांच्या मूळ शाळेवर पदस्थापित करण्याची तरतूद करन्यात यावी.हे न करता जर शिक्षक भरती न झाल्याने निर्माण झालेल्या असमतोलासाठी काही ठराविक शिक्षकाना फटका बसला तर नेहमीच ते अस्वस्थ रहातील.
12/9 रद्द झाल्याने नुकतेच बदलीपात्र झालेले आमच्यातील युवा बांधवाना खो मिळनार आहे.12/9 मुळे युवा शिक्षकांना मिळालेला थोडासा दिलासा मिळालेला पण तो टिकला नाही. मुळात बदल्या व्हाव्यात,न व्हाव्यात,27/2चा जि आर योग्य अयोग्य,न्यायालयात गेल्याने फायदा झाला तोटा झाला,याबाबत मी मत मांडत नाही कारण गेली वर्षभर याबाबत अनेक तज्ञांनी उहापोह केला आहे. *फक्त जर बदल्या करताना समाणिकरण बाबत वरील बाबी केल्यास नक्किच काही अंशी दिलासा मिळेल.व बदली सुलभ होईल*
आपला
*🖋अमोल शिंदे✒*
सहाय्यक शिक्षक
जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाण मळा आरग
(हे माझे वैयक्तीक मत असून संघटनची भूमिका नाही)
आपली मतं ही जरूर सांगा
शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची..
शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली; पण कार्यमुक्ती???? *शिक्षक भरती महत्वाची व लवकर कार्यमुक्ती गरजेची.. 🖋अमोल शिंदे🖋...
-
*स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहन कोणी करावे यावरून काहि ठिकाणी प्रश्न निर्माण व्हावेत??* स्वातंत्र्य दिन/प्रजासत्ताक द...
-
*जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्या चा हक्क आहे* सध्या एक पत्र सोशल मीडिया वर फिरत असून आर्थिक ...
-
*शिक्षणाचे माध्यम : ट्रेंड आणि सत्य* - अमोल शिंदे 9429453475 अन्न, वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांमध्ये कालानुरूप बदल वाढ होत आरोग्य व शिक्ष...
-
🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅 *शिक्षक आम्हाला शिकवू द्या असे म्ह...
-
*शालार्थ पगार बिले ऑनलाईन पगार ऑफलाईनच* *5 लाख 70 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा पगार करणारी शालार्थ प्रणाली असून अडचण नसून खोळंबा ...
-
शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या गाड्यामध्ये इलेक्ट्रॉनिक काटे कधी येणार??? बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर शालेय पोषण आहार तांदूळ व धान्यादी म...
-
अति आत्मविश्वास ... आज लागलेल्या उत्तर प्रदेश मधील पोट निवडणुकीच्या निकलानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अति आत्मविश्वासामुळे पराभव झ...
-
कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत जुनी पेन्शन हक्क संघटनची मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे मागणी शिक्षणसेवक कालावधी हाच परिविक्...
-
*तुटलेली फुले,* *"सुगंध" देऊन जातात...🌹* *गेलेले क्षण,* *"आठवण" देऊन* *जातात...💧💧* *प्रत्येकांचे ...