*शासकीय कर्मचाऱ्यास तिसरे अपत्य असल्यास ते प्रचंड तणावात आहेत त्यांनी तणावातून बाहेर यावे...*
👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧
✍✍ *अमोल शिंदे*✍✍
*जिल्हाध्यक्ष*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली *
आपले कुटूंब लहान असावे.याबाबत दुमत नाही.अन त्यासाठी सर्वानी जाणीव जागृती निर्माण केली अन त्याला यश येऊन जन्मदरात लक्षणीय घट आली.यासर्वासाठी राज्यातील शिक्षक व सरकारी कर्मचारी यांचे योगदान खूपच महत्वाचे आहे.पण काही अपवादात्मक परिस्थितीत याबाबत शिथिलता मिळायला हवी.त्या अनुषंगाने काही बाबी मांडतोय-
28 मार्च 2005 रोजी शासनाने एक अधिसूचना काढली व शासकीय सेवेत सेवाप्रवेशावेळी एक आवश्यक अर्हता म्हणून लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन बाबत नियम जाहीर केले. *अलीकडे काही लोक याबाबीचा कर्मचाऱ्याना अडचणीत आणण्यासाठी हेतुपुरस्कर वापर करत असून सर्वच कर्मचारी संघटनांनी याबाबत सरकारकडे ठोस मागणी करत यामधील काही अटी शिथिल करन्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.याबाबत अनेक बंधू भगिनी याबाबत भूमिका मांडावी असे सांगत.त्या अनुशंगाने अधिसूचना व काही अशी प्रकरणे याची माहिती घेऊन मत मांडत आहे.*यासाठी पहिल्यांदा काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
👇👇👇👇👇👇👇
🎓 *1.28 मार्च 2005 रोजी शासनाने एक अधिसूचना काढली व लहान कुटुंबाबत नियम आणले यात तिसऱ्या मुद्यानुसार या नियमाच्या अमलबजावणीपासून पुढील 1 वर्षात एका प्रसूतीत झालेल्या अपत्यांना सूट देण्यात आली आहे.*
🎓 *2.याच अधिसूचनेत 5 वा मुद्दा जेथे निवड प्रक्रिया हे नियम लागू होण्यापूर्वी सुरू झाली आहे त्यांना हे नियम लागू रहाणार नाहीत.*
🎓 *3.याच अधिसूचनेत 6 वा मुद्दा कर्मचाऱ्याच्या दृष्टीने अत्यन्त महत्वाचा असून त्यानुसार या नव्या नियमांमध्ये शासनाने काहीही अंतर्भूत केले असले तरी, शासनास न्याय व संयुक्तिक वाटेल अशा परिस्थितीत आणि आशा रीतीने शिथिलतेची कारणे लेखी नोंदवून या नियमातील कोणत्याही तरतुदी शिथिल करता येतील.*
*वरील तीन मुद्दे पाहिल्यास 28 मार्च 2006 नंतर तिसरे अपत्य झाले तर संबंधीत कर्मचारी बडतर्फच होणार असे भासवून कर्मचाऱ्याना अडचणीत आणले जाते त्यांनी घाबरून न जाता आशा रीतीने शिथिलतेची कारणे लेखी नोंदवून या नियमातील तरतुदी पासून शिथिलता मिळू शकते याची नोंद घ्यावी.*तसेच सर्वच कर्मचारी संघटनानी सदर कर्मचाऱ्याना सहज सदर शिथिलता मिळावी यासाठी कार्यपद्धती विकसित करण्यासाठी प्रयत्न करून या कर्मचाऱ्याना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत.पण काही संघटनाचे नेते आशा कर्मचाऱ्याना घाबरवताना दिसतात त्यांनी असे न करता या कर्मचाऱ्याची आर्थिक लूट व मानसिक खच्चीकरण होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत.
🔦🔦🔦🔦🔦🔦🔦
संदर्भ:-
🔍 *शिक्षणाधिकारी अशोक नानासाहेब कडूस यांना पुन्हा शासन सेवेत घेण्याबाबत दिनांक 8 डिसेंबर 2017 रोजीचा शासन आदेश*
🔍 *28 मार्च 2005 ची अधिसुचना*
मुळात लहान कुटुंब सुखी कुटुंब अन शासनाच्या कर्मचारी याबाबत सजग आहेत.पण काही अपवादात्मक परिस्थितीत तिसरे अपत्य झाले असल्यास सदर कर्मचाऱ्याबाबत मानवी दृष्टिकोन ठेवून दिलासा द्यावा या हेतूने लिहत आहे. *कारण अनेक कुटुंबे,बंधू- बहिणी प्रचंड तणावात आहेत.तर काही चुकीच्या पळवाटा भविष्यात अनेक कौटुंबिक प्रश्नास जन्म देणार आहेत.*
✍✍✍✍✍✍✍✍
आपला,
*अमोल शिंदे*
*जिल्हाध्यक्ष*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली *
👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👩👧👧👨👨👧👨👨👧👨👨👧👨👨👧
https://drive.google.com/file/d/1H74K-V8PeBMJDghyJrlr7NVpEb-mTHCr/view?usp=drivesdk शिक्षणाधिकारी कडूस यांची सेवेत परत घेण्याबाबत शासन आदेश लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता
🔍 *28 मार्च 2005 ची अधिसुचना*
https://drive.google.com/file/d/1qqA3MMqQm1u8Jz3USlOHRC-xKY9pElZg/view?usp=drivesdk
Tisare apatyasambadhi adhik mahiti adalyas margadarshan karawe...
ReplyDeleteसर खूप छान विचार मांडले तुम्ही. अपवादात्मक परिस्थिती मध्ये तिसऱ्या अपत्याला मान्यता दयावी.या करिता आपल्या शिक्षक संघटना यांनी भांडायला हवे. आम्ही तुमच्या सोबत आहोत सर.
ReplyDeleteCorrect sir
Deleteसर 3 रे अपत्या बद्दल खुप मानसिक व आर्थिक त्रास होत आहे कोनाकडे काही मार्गदर्शन असेल तर 9511266586 कॉल करा मदत होईल
ReplyDelete3 re aptya cha problem majha sobat ala ahe ani mala unukampa madhe nokari sathi adchan aali ahe
Deleteसर कृपया अधिसूचना आणि शासन निर्णय यांमधील फरक कळेल का??
ReplyDeleteVery important information about third born child in apvadatmak condition
ReplyDeleteसमजा सर पहिल्या दोन पैकी एखादे मुल अपंग असेल तर तिसरे अपत्य झाल्यास काय ते मार्गदर्शन व्हावे.
ReplyDeleteएखादयाला 2 मुली असल्यास त्याला मुलगा पाहीजे असल्यास त्याने काय करावे ते मार्गदर्शन व्हावे
ReplyDeleteएखादयाल 3 मुल झाले तर त्या बाबत काही मार्गदर्शन भेटले का
ReplyDeleteएखादयाला 2 मुली असल्यास त्याला मुलगा पाहीजे असल्यास त्याने काय करावे ते मार्गदर्शन व्हावे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteSir aapla contact no. Milel ka kiwa aapnas contact kasa karta yeil
ReplyDeleteSir 2muli asel tar ani mulga hava asel tar kai karave pls sanga sir apla contcat no dya pls
ReplyDeleteSir your contact no plz
ReplyDeleteNamskar sir, Mi Thanyamdhun sakshi More, majhe vadil thane mahanagar paliket hote on duty off zhale aslyamule tyancha jagi mi 2 varsha zhale arja kela ahe tr amhala 3 aptya aslyamule amcha arja nakarnyat yet ahe + Majhe vadil 2008 la basicvr aalyamule amhala pension suddha nahi ahe, so sir mala kai help zhali asti tr tumchi tr barr hoil, jyana nokrihi Nahi n pension suddha nai ashyani karaycha kai??? konitri amhala ya regarding help kel tr barr hoil....kai krta yeil yavr????
ReplyDeleteमला दोन मुली असून त्यातील एक १०० टक्के मतीमंद १० वर्ष जागेवर झोपून आहे तर तिसरे अपत्य पाहिजे असेल तर त्या बाबत काही नियमात तरतूद आहे का
ReplyDeleteएकदा का शासकीय सेवेत रुजू झालात आणि त्यानंतर तिसरे अपत्य झाले तर घाबरायची काहीच गरज नाही
ReplyDeleteसर दोन अपत्या पैकी एक अपत्य पूर्ण पने अपंग आहे तर तिसरे मूल करता येईल का याबाबद काही शासन निर्णय आहे का
ReplyDeleteशिंदे सर, तुम्ही खूप प्रामाणिकपणे विचार मांडल्यामुळे प्रथम तुम्हाला salute. कर्मचाऱ्याला कामावरून काढण्याचे अनेक नियम शासन तयार करते. सध्याचे कर्मचारी विचार करतात, जाऊ द्या. काही होत नाही. नियम हे वरवर असतील. आणि कोणी बांधव अडचणीत आला तर संकुचित विचार करतात, आपले तर काय जाते.पण एक ध्यानी घ्या, नोकरी ही आपली भाकरी आहे आणि आपण जर आपल्या कर्तव्य कर्तव्याशी प्रामाणिक आहोत, तर केवळ तिसरे अपत्य झाले म्हणून नोकरीवरून सरळ कमी करणे हे अनैसर्गिक आणि अमानवी आहे. सिनेमातले अमीर खान, सैफ अली खान जे करतात, त्या बद्दल त्यांच्या चित्रपटांवर सरकार बंदी घालील का ? उलट ते शासनाचे ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. अनेक मंत्री संत्री यांना ४ मुलीवर ५ वा मुलगा झाला तरी ते मंत्री पदी आहेत.म्हणजे त्यावेळी त्यांनी केले हे विचारपूर्वक केले असेल ना. आणि आज सुद्धा काही मंत्र्यांना २-३ बायका आणि ५-६ मुले असल्याचे उघड होऊन पक्ष त्यांना पाठीशी घालतो, तरी हरकत नाही. पण शासनाने केवळ लहान कुटुंबाचा कायदा करून रोजीरोटी हिसकावून घेण्याचा कायदा रद्द करावा. अनेक प्रगत राष्ट्रांत अमेरिका, कॅनडा येथे असे अनैसर्गिक कायदे नाहीत, हे समजून घ्यावे. आम्हाला अफगाणिस्तान, ब्रह्मदेश आणि कोठून कोठून आलेले शरणार्थी चालतात आणि शासकीय कर्मचाऱ्याला प्रयोगाचा उंदीर बनवून जगण्याचा हक्क हिरावून घेणे, अत्यंत चुकीचे आहे. हा कायदाच लवकरात लवकर बंद करावा. आधी सामान्य नागरिकाला कायदा करा की तिसरे अपत्य झाल्यास काम , धंदा करता येणार नाही, मग सरकारी नोकराला लागू करा.
ReplyDeleteएखादयाला 2 मुली असल्यास त्याला मुलगा पाहीजे असल्यास त्याने काय करावे ते मार्गदर्शन व्हावे
ReplyDeleteमी तीन अपत्याची माहिती व लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नोकरीला लागताना भरून दिले होते आणि माझे प्रोबेशन पण पुर्ण झाले होते तरी नोकरी लागल्यानंतर अठरा महिन्यानंतर मला कामावरून कमी केले आहे तरी मार्गदर्शन व्हावे अशी विनंती आहे
ReplyDelete2006 नंतर तिसरे अपत्य झाल्यावर. शासनाने शिक्षक यांना सेवेतुन बडतर्फ केले आहे का?
ReplyDeleteसमजा सर पहिल्या दोन पैकी एखादे मुल अपंग असेल तर तिसरे अपत्य झाल्यास काय ते मार्गदर्शन व्हावे.
ReplyDelete